चिपळूण:-पिंपळी खुर्द परिसरातील कॅनॉलवरील ब्रीज येथे ओव्हरटेक करणाऱया दुचाकीस्वाराने दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याची घटना जानेवारी महिन्यात घडली. यात एकजण जखमी झाला.
रणजीतसिंह प्रताप चव्हाण (22) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद प्रवीण सदाशिव जाधव (चिपळूण पोलीस ठाणे) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 21 जानेवारी रोजी सायंकाळी 6.35 वाजण्याच्या सुमारास रणजीजसिंह चव्हाण हा त्याच्या ताब्यातील दुचाकीने पिंपळी खुर्द परिसरातील कॅनॉलच्या ब्रीजवर आल्यावेळी त्याच्यापुढे जाणारा चेतन कांबळे याच्या दुचाकीला उजव्या बाजूने बाजू काढत होता. त्यावेळी समोर रस्त्यावर खड्डा आल्याने रणजीजसिंह चव्हाण याने दुचाकी डाव्या बाजूस नेत चेतन कांबळे यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघात ठिकाणी चव्हाण न थांबता निघून गेला. या अपघातात कांबळे हा जखमी झाला आहे. याप्रकरणी रणजीतसिंह प्रताप चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.