रत्नागिरी:-शहरालगतच्या भाटये सुरुबन येथे तरुणाच्या मोबाईलची चोरी केल्याप्रकरणी 2 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 3 फेबुवारी रोजी दुपारी 12 च्या सुमारास घडली. अमान इमान हुसेन मुल्ला (24) व अशर्द राशिद खान (25) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. मोबाईल चोरीला गेल्याप्रकरणी इंझमाम अस्लम काझी (21) यांनी तक्रार दाखल केली होत़ी. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 303(2) नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.