रत्नागिरी:-गुहागर तालुक्यातील असोले येथे चुलीजवळ फीट येवून पडल्याने महिला भाजून जखमी झाल़ी. ही घटना शनिवारी सकाळी 8.30 च्या सुमारास घडली. सानिका समीर पोसकर (38, रा. असोले, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) असे भाजलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचार करण्यात येत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सानिका यांना चक्कर येण्याची सवय होती. शनिवारी सकाळी त्या चुलीजवळ असताना अचानक त्यांना फिट आली आणि त्या चुलीजवळ पडल्या. त्यामध्ये त्यांचा चेहरा भाजला. उपचारासाठी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली येथे दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.