रत्नागिरी:-शहरातील अभ्युदयनगर येथील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना 29 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 2 च्या सुमारास घडली. या प्रकरणी महेंद्र कृष्णा साळवी यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केल़ा एकूण 86 हजार रुपये किंमतीच्या 24 बॅटऱ्या चोरीला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.