खेड / प्रतिनिधी:-तालुक्यातील खोपी येथे रॉकेलने चूल पेटवत असताना भडका उडाल्याने गंभीररित्या भाजलेल्या 69 वर्षीय वृद्धेचा कोल्हापूर येथील सी.पी.आर. रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
ही वृद्धा राहत्या घरातील चूल रॉकेलने पेटवत असताना भाजली होती. उपचारासाठी खोपी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रूग्णालयात उपचार करून कोल्हापूर येथील सी.पी.आर. रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दरम्यान उपचार सुरू असताना वृद्धेचा मृत्यू झाला.