चिपळूण : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयातील आर्या तांबे हिची खेलो इंडिया स्पर्धेकरिता निवड झाली आहे. नुकत्याच भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ऑल इंडिया योगा स्पर्धेत २२० विद्यापिठातील एकूण २३२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत मुंबई विद्यापिठाने पाचवा क्रमांक मिळवून खेलो इंडिया या भारत सरकारच्या स्पर्धेकरिता आपले स्थान निश्चित केले.
मुंबई विद्यापिठाचा योगाचा संघ-सानिका गायकर (एस. आय. ए कॉलेज डोंबिवली), राजनंदिनी कनोजिया (ठाकूर कॉलेज कांदिवली), रुही घाग (एसी पाटील कॉलेज खारघर), अमिषा मिश्रा (ठाकूर कॉलेज कांदिवली), आर्य तांबे (डीबीजे कॉलेज चिपळूण), ऋतुजा मानवेकर (एमएल डहाणूकर कॉलेज विलेपार्ले) या खेळाडूंचा या संघात समावेश आहे. या ऑल इंडिया स्पर्धेनंतर प्रथम आठ येणाऱ्या संघास खेलो इंडिया स्पर्धेकरिता तिची निवड झाली. याबद्दल आर्या तांबे हिचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. या वेळी नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, सुचय रेडीज, शांताराम जोशी, नियामक समिती सदस्य, प्राचार्य डॉ. माधव बापट, रजिस्ट्रार अनिल कलकुटकी, जिमखाना विभागाचे चेअरमन वामन जोशी, योगा प्रशिक्षक रणवीर सावंत, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन विलास जोशी, वरिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. सम्राट माने, क्रीडा शिक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.