दापोली : दापोली आगाराला ८० बसेसची गरज असून पहिल्या टप्प्यामध्ये ८ बसेस दापोली आगारासाठी आल्या असून उर्वरित बसेस पुढील काळात देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. दापोलीवर लक्ष देतानाच खेड आणि मंडणगड येथे दुर्लक्ष होणार नाही असे मत राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम न्यांनी दापोली आगाराच्या एसटी बसेस लोकार्पण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले.
दापोलीत आगारामध्ये नव्या बीएस ६ प्रणालीच्या दाखल झाले असून याचा लोकार्पण सोहळा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या उपस्थितीत दापोली बस स्थानकामध्ये करण्यात आला. नव्या बसेस दाखल झाल्यानंतर चालक व वाहकांची जबाबदारी स्वाढली असून प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याबरोबरच प्रवाशांच्या वेळेची काळजी चालक वाहकाने घेण्याची गरज आहे. आगार व्यवस्थापनाने प्रवाशांना सुखकारक सेवा कशी देता येईल याकडे लक्ष द्यावे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. यावेळी श्रीफळ वाढवून तसेच फित कापून नव्या आठ बसेसचे पत्रकारांचे विशेष आभार मानण्यात आले.
लोकार्पण करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख उन्मेश राजे, माजी सभापती किशोर देसाई, चारुता कामतेकर, प्रकाश कालेकर, राजेंद्र पेठकर, कृपा घाग, शबनम मुकादम, निलेश शेठ, दिप्ती निखार्गे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. दापोली आगाराला या नव्या बसेस मिळण्यासाठी दापोली तालुका मराठी पत्रकार परिषद यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. तसेच गेली दोन वर्षे सातत्याने प्रयत्नही केला जात आहे. याबद्दल व्यवस्थापनातर्फे
बसेसची सजावट करण्यासाठी कोकण एसटी प्रेमी, दापोली-मंडणगड तालुका प्रवासी मित्र संघटना, यांत्रिकी विभागाचे कर्मचारी, चालक, वाहक व अधिकारी यांनी प्रयत्न केले. यावेळी मान्यवरांचे स्वागत आगार व्यवस्थापक उबाळे यांनी केले. यावेळी कार्यशाळा अधिक्षक मुनाफ राजापरक, हर्षल नाफडे, तुषार कोळी, अजित बाळ, शरद देवळेकर, प्रकाश जोशी, अनिल साळुंखे, संसारे, सचिन राजेशिर्के यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.