रत्नागिरी:-येथील उर्मी ग्रुपतर्फे ‘उत्सव खरेदीचा’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये विविध वस्तू, कपडे, दागिने, खाद्यपदार्थ यांची रेलचेल असणार आहे.
मारुती मंदिर येथील महिला मंडळ हॉलमध्ये येत्या १४ ते १६ फेब्रुवारीला हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशी १४ फेब्रुवारीला सायंकाळी ४ ते ८ आणि १५ व १६ ला सकाळी १० ते रात्री ८ हा खरेदीचा उत्सव सुरू राहणार आहे. नागरिकांना आवर्जून भेट देऊन प्रदर्शनाचा व खरेदीचा आनंद लुटावा, असे आवाहन उर्मी ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.