देवरुख:-आदर्श क्रीडा आणि सामाजिक प्रबोधिनी, चिपळूण यांनी आयोजित केलेल्या “जिल्हा अजिंक्यपद हौशी शरीर-सौष्ठव स्पर्धेत” टायटन युनिसेक्स जिमच्या श्री. रोहन विद्याधर भालेकर यांनी “रत्नागिरी मेन्स फिटनेस जिल्हा हौशी शरीर सौष्ठव स्पर्धा: २०२५” मधील गट क्रमांक-२ मध्ये तिसरा क्रमांक प्राप्त केला. श्री. रोहन भालेकर यांची ९ जानेवारी, २०२५ रोजी कोल्हापूर येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद हौशी शरीर सौष्ठव स्पर्धसाठी निवड झाली आहे. श्री. रोहन भालेकर यांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी टायटन जिमच्यावतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
श्री. रोहन भालेकर यांना माजी सैनिक व ज्येष्ठ व्यायामपटू श्री. सुनील जाधव व श्री. अभिषेक संसारे यांनी सन्मानित केले. श्री. रोहन यांना जिमचे प्रशिक्षक नंदकिशोर साळवी, जिमचे संचालक सागर संसारे व नासिर फुलारी यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच नितेश कांबळे, अक्षय कांबळे आणि विधाता जाधव यांचे विशेष सहाय्य लाभले. या कार्यक्रमाला प्रा. धनंजय दळवी, प्रणय शेलार, सलमान साटविलकर, मनोज रायका, कार्तिक भाटकर, दीपक करंडे, हर्ष कोटकर, राज भायजे आणि सोनम लांबे उपस्थित होते.