दापोली:-तालुक्यातील गव्हे येथे शुल्लक कारणावरून मारहाण झाल्याची घटना रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी 8 वाजण्याच्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश विजय लिंगावळे ( 42 राहणार पहिली वाडी) हे 2 फेब्रुवारी रोजी त्यांची मुलगी व आजी या रहात असलेल्या घरामध्ये लाईट बिल घेऊन परत येत होते. त्या वेळेला लिंगावळे यांचे काका प्रकाश भिकू लिंगावळे (राहणार गव्हे पहिली वाडी) यांनी जमीन जागेच्या वादावरून सतीश याला शिवीगाळ करून हातातून आणलेल्या कळकाच्या काठीने डोक्यात व डाव्या हाताच्या मनगटावर मारहाण करून दुखापत केली. यामध्ये सतीश लिंगावळे जखमी झाले आहेत. प्रकाश लिंगावळे यांच्या विरोधात दापोली पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 118 (1) 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.