दापोली:-शहरातील दापोली ते हर्णै जाणाऱ्या रस्त्यावर उपजिल्हा रुग्णालयासमोर मुख्य रस्त्यावर शिल्पेश किसन बैकर यांनी वाहतुकीस अडथळा होईल अशा प्रकारे गाडी उभी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जानेवारी रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास दापोली-हर्णै रस्त्यावर उपजिल्हा रुग्णालयासमोर बैकर यांनी मॅक्झिमो गाडी रस्त्यावर उभी करून वाहनांना अडथळा निर्माण होईल, तसेच सार्वजनिक रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांना धोका होईल, अशा स्थितीत गाडी उभी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.