चिपळूण:-बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरटयाने घरातून दागिन्यासह रोख रक्कम असा एकूण 70 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत शहरातील खेंड येथील रुद्र बंगला येथे घडली. या प्रकरणी रविवारी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद एका महिलेने दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांच्या पतीचा अपघात झाल्याने उपचारासाठी त्याच्या सोबत पुणे येथे गेली होती. असे असताना 31 जानेवारी रात्री 9 वाजल्यापासून ते 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजेपर्यंतच्या कालावधीत चोरटयाने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून त्यातून घरात प्रवेश केला. तसेच घरातील दोन बेडरुममधील लोखंडी कपाटाच्या लॉकरमधील 15 हजार व 22 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, तसेच 3 हजार रुपये किंमतीची 3 चांदीची नाणी असा 70 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार चिपळूण पोलिसांनी अज्ञात चोरटयावर रविवारी गुन्हा दाखल केला.