श्रीरामसेतू कार्यात वापरलेल्या पाषाणाच्या असल्याचा अंदाज
दापोली/सुदर्शन जाधव:-तालुक्यातील दाभोळ समुद्रावर फिरण्यासाठी गेलेल्या श्लोक देसाई या मुलाला सापडलेला दगड हा पाण्यावर तरंगत असल्याने या दहडाबाबत कुतूहूल वाढले आहे. हा पाषाण श्रीरामसेतू कार्यात वापरलेल्या पाषाणाच्या जातुकळा असावा, असा अंदाजही पाहणारे व्यक्त करत आहेत.
दाभोळ येथील श्लोक देसाई याला समुद्रकिनाऱ्यावरील दगड गोळा करून तो रंगवणाचा छंद आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी श्लोक देसाई हा वडिलांसोबत सकाळी समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेला होता. तो फिरता-फिरता दिसणारे पाषाण गोळा करत होता. असताना त्याला हा पाषाण दिसून आला. हा पाषाण उचलताना त्याला इतर पाषाण अर्थात दगडांपेक्षा हलका लागला. त्याने ही बाब आपल्या वडिलांना सांगितली व तो पाषाण घेवून घरी आला.
या छोटया दगडाला छीद्र दिसून येत होती व इतर पाषाणांपेक्षा हा पाषाण वेगळा दिसत होता. त्यामुळे त्याला स्वच्छ धूवून पाण्यात टाकले असता तो पाण्यावर तरंगू लागला. पाण्यावर तरंगणारा पाषाण पाहिल्यानंतर हा साधारण नसल्याचे देसाई कुटुंबियांच्या लक्षात आले. त्यांनी इतर लोकांनाही या छोटया पाषाणाबाबत सांगितले. त्यामुळे हा पाषाण श्रीराम लंकेत जाताना बांधण्यात आलेल्या सेतूसाठी वापरलेला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. कारण लंकेत सीता मातेला आणण्यासाठीही वानरसेनाने श्रीरामाचे नाव लिहून पाण्यात पाषाण टाकले होते व ते पाषाण पाण्यावर तरंगत राहून सेतू तयार केला होता, असे पुराणकथांमध्ये सांगितले जाते. त्यातीला पाषणा हा भाग असावा, अशी चर्चा केली जात आहे.
पाण्यावर तरंगणारा पाषाण पाहण्यासाठी देसाई कुटुंबाच्या घरी अनेकजण हजेरी लावत आहेत. शिवाय छोटे-दगड गोळा करण्याचा व ते आकर्षित रंगवण्याचा छंद असणाऱ्या श्लोकमुळे अनेकांना हा तरंगता पाषाण पहायला मिळाल्याचे बोलले जात आहे. शिवाय हा पाषाण श्रीरामसेतू कार्यात वापरलेला असावा, असा अंदाजही पाहणारे व्यक्त करत आहेत.