रत्नागिरी:-तालुक्यातील एका गावात 9 वर्षाच्या मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या संशयिताची न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. हरिश चंद्रकांत जाधव (30, रा.चरवेली रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आह़े. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता 64 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पॉक्सो) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रत्नागिरी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस़ एस़ गोसावी यांनी जामीन अर्जावर निकाल दिला. संशयिताच्यावतीने लोकअभिरक्षक कार्यालयाचे उपमुख्य अभिरक्षक उन्मेष मुळये यांनी काम पाहिल़े गुन्ह्यातील माहितीनुसार, आरोपीने 8 डिसेंबर 2024 रोजी 9 वर्षाच्या मुलीसोबत गैरप्रकार केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार हरिश याच्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली होती.