दापोली:-तालुक्यातील आंजर्ले येथे विनोद राधेश्याम निशाद (38, आंजर्ले, केतकी रिसॉर्ट, मूळ उत्तर प्रदेश) याचा मृत्यू झाल्याची घटना 29 जानेवारी रोजी सकाळी 4ः45 वाजण्याच्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद निशाद हा विनायक निजसुरे यांच्याकडे फर्निचर बनवण्याचे काम करत होता. 29 जानेवारी रोजी पहाटे 3ः30 वाजण्याच्या दरम्यान विनोद यास अचानक ताप आल्याने त्याचे अंग दुखू लागले. तेव्हा विनोदसोबत असलेले प्रद्युम मोर्या व शत्रुघ्न लालघर शर्मा यांना विनोदने त्रास होत असल्याचे सांगितले. या दोघांनी तात्काळ त्याला दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यानी तपासून तो मृत असल्याचे जाहीर केले. याबाबत दापोली पोलीस स्थानकात अकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.