रत्नागिरी:-श्रीमंत पेशवाई चषक रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत कुमार गटात रत्नागिरीचा ओम पारकर विजेता ठरल़ा. राधाकृष्ण मंदिर रत्नागिरी येथे 2 फेबुवारी रोजी या स्पर्धा पार पडल्य़ा श्रीमंत पेशवाई माघी गणेशोत्सव, श्री हनुमान मित्र मंडळ, मारुती आळी, रत्नागिरी आयोजित व रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने 3 री श्रीमंत पेशवाई चषक रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा 2024ö25 चे आयोजन करण्यात आले होत़े.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्री हनुमान मित्र मंडळ मारुती आळी चे सल्लागार प्रमोद शेरे, अध्यक्ष मंगेश संसारे, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, स्पर्धा आयोजक मिलिंद दळी, स्पर्धा प्रमुख सचिन बंदरकर कॅरम असोसिएशनचे सचिव मिलिंद साफ्ते, प्रमुख पंच मंदार दळवी, सागर कुलकर्णी व खेळाडू तसेच प्रेक्षक उपस्थित होते.
कुमार गटाच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या ओम पारकर याने राजापूरच्या हर्षल पाटील याचा 12ö01, 13-07 असा पराभव केला. कुमार गटाच्या उपांत्य सामन्यात ओम पारकर याने आर्यन राऊत तर हर्षल पाटील याने द्रोण हजारे याचा पराभव केला. किशोर गटाच्या अंतिम सामन्यात वेदांत कनगुटकर याने तौहीद साटविलकर याचा 13ö12, 11ö02 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. किशोर गटाच्या उपांत्य सामन्यात वेदांत कनगुटकर याने सार्वेश आमरे याचा तर तौहीद साटविलकर याने आयन कालकर याचा पराभव केला. किशोरी गटात राजापूरच्या निधी सप्रे हिने रत्नागिरीच्या स्वरा मोहिरे हिचा 13-12 व 15-06 असा सरळ दोन सेट मध्ये पराभव केला. किशोरी गटाच्या उपांत्य सामन्यात निधी सप्रे हिने स्वरा कदम हिचा तर स्वरा मोहिरे हिने सृष्टी चवंडे हिचा पराभव केला.