खेड / प्रतिनिधी:- तालुक्यातील खवटीजवळील रिक्षा थांब्यानजीक मोकळया जागेत दोन ठिकाणी सुरू असलेल्या मटका जुगार अड्डयावर येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने धाडी टाकून दोघांना रंगेहाथ पकडले. या धाडीत दोन हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
नितीन गौतम धोत्रे (30 रा. खवटी-बौद्धवाडी), मंगेळ मधुकर दळवी (45 रा. खवटी-तानाजीवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. नितीन धोत्रे हा एका दैनिकात प्रसिद्ध होणाऱया शुभ अंकावर पैसे लावून जुगार खेळवत असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
त्यायाकडून 1,010 रूपये व जुगारो साहित्य पोलिसांनी जफ्त केले. या बाबत पोलीस शिपाई कृष्णा बांगर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मंगेळ दळवी हा देखील एका दैनिकात प्रसिद्ध होणाऱ्या शुभ अंकावर पैसे लावून जुगार खेळवित असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यायाकडून 910 रूपये व जुगारो साहित्य पोलिसांनी हस्तगत केले. या बाबत पोलीस शिपाई तुषार झेंडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.