गुहागर : घरात कोणी नसल्याच्या संधीचा फायदा घेत विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या 65 वर्षीय अशोक भुवड याला गुहागर पोलिसांनी अटक केली आहे. गावाचा उपसरपंच असलेल्या भुवडला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आले आहे.
गुहागर तालुक्यातील या घटनेचे पडसाद मुंबईपर्यंत उमटले आहेत. गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी अशोक भुवडला अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र प्रकृती बिघडल्याने अटक करण्यात आले नव्हते. प्रकृती स्थिर झाल्यावर सोमवारी पहाटे त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.