रत्नागिरी : तालुक्यातील जाकादेवी-राई रस्त्यावरील विल्ये येथे ओव्हरटेक करताना दुचाकीस्वाराने एसटीला धडक दिल़ी. ही घटना शुक्रवारी सकाळी 10.30 च्या सुमारास घडल़ी. गणेश प्रकाश सावंत (41, ऱा राई, रत्नागिरी) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आह़े. त्याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल़ा.
गणेश सावंत हा 31 जानेवारी रोजी सकाळी आपली दुचाकी (एमएच 04 एमडी 7122) घेऊन जाकादेवी ते राई असा जात होत़ा. सकाळी 10 वा. विल्ये डावखोल फाटयानजीक गणेश हा चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करत होत़ा. यावेळी समोरुन येणाऱ्या एसटीला गणेशच्या ताब्यातील दुचाकीने धडक दिल़ी, अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसात करण्यात आली आह़े.