रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा समिना जेटी येथे गंभीर जखमी होवून मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आह़े.
12 डिसेंबर 2024 रोजी रात्री 11.30 च्या सुमारास मिरकरवाडा जेटीवरील बोट बांधायच्या लोखंडी पाईपला आपटून पडल्याने तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होत़ी. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल केले असता 15 डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला होत़ा. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली होत़ी मृताचे नाव, गाव अद्याप समजून आलेले नसून त्याच्याबाबत कुणाला काही माहिती असल्यास शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आह़े.