मिरजोळे पाडावेवाडी येथील माघी गणेशोत्सवानिमित्त स्पर्धा, दर्जेदार नाटकांची पर्वणी
रत्नागिरी : शहरानजिकाच्या मिरजोळे येथील श्री माघी गणेशोत्सव मंडळ, पाडावेवाडी यांच्यावतीने गेल्या तीन दिवसांपासून रंगलेल्या तालुकास्तरीय नाटय़स्पर्धेने रसिकवर्गाला पर्वणी लाभली आहे. एकाहून एक अशा सरस आणि दर्जेदार नाटकां सहभाग आणि त्यातील बहारदार अभिनयाने चांगली रंगत आणली आहे.
शनिवार दि. 1 फेब्रुवारी पासून या तालुकास्तरीय नाटय़स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. सोमवार दि. 8 फेब्रुवारी 2025 या कालावधीत माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रींची प्रतिष्ठापना झाल्यानंतर पहिल्या दिवशी नाटय़ स्पर्धेच्या शुभारंभाला नाटक – मी तर बुवा अर्धा शहाणा च्या नूतन बालमित्र बोरकर संगीत नाटय़ मंडळ, वरवडे यांनी सादरीकरण करत रसिकवर्गाला खिळवून ठेवले. रविवार 2 फेब्रुवारी रोजी रात्रौ 10.00 वा. चांदणी हे नाटकाया कलारंग, रत्नागिरी या संस्थेने केलेल्या सादरीकरणाने देखील ााांगला मोहिनी घातली.
सोमवार दि. 3 फेब्रुवारी रोजी गंध निशिगंधाचा हे नाटक जुगाईदेवी आणि सुयोग कलामंच गावडेआंबेरे यांनी सादर करत या स्पर्धी रंगत आणखीना वाढवली. आज मंगळवार दि. 4 फेब्रुवारी रोजी सायं. 8.00 ते 9.00 वा. भजन: पाडावेवाडी, मिरजोळे, रात्रौ 10.00 वा. नाटक : कडीपत्ता (कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघ, कोतवडे) ााs सादरीकरण होणार आहे. कडीपत्ता हे नाटक राज्य नाटय़स्पर्धेत अव्वल ठरलेले होते. बुधवार दि. 5 फेब्रुवारी रोजी सायं. 8.00 ते 9.00 वा. भजन: सोंबा रवळनाथ भजन मंडळ, बांबर, रात्रौ 10.00 वा. नाटक : इष्काची इंगळी डसली (संकल्प कलामंच, रत्नागिरी), सादरीकरण होणार आहे.
गुरूवार दि. 6 फेब्रुवारी रोजी सायं. 8.00 ते 9.00 वा. भजन: कालिकादेवी भजन मंडळ, पाडावेवाडी, रात्रौ 10.00 वा. नाटक : नाती गोती (श्री सिद्धीविनायक कलामंच, रत्नागिरी). शुक्रवार दि. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वा. श्री सत्यनारायणाची महापुजा, दुपारी 1.00 ते 3.00 वा. महाप्रसाद, सायं. 8.00 ते 9.30 वा. मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण सोहळा, वा त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम. शनिवार दि. 8 फेब्रुवारी रोजी सायं 4 ते 8 वा. श्रींची विसर्जन मिरवणूक अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे सर्व भाविक व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री माघी गणेशोत्सव मंडळ पाडावेवाडी आणि व्यवस्थापक, श्री कालिकादेवी नाटय़कलामंच, मिरजोळे, पाडावेवाडी यांनी केले आहे