दापोली : श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल केलेल्या ७२ वर्षीय वृद्धाचा शनिवारी सकाळी आकस्मिक मृत्यू झाला. अशोक भिकू बागडे (रा. कोंकबाआळी, दापोली) असे त्यांचे नाव आहे.
अशोक बागडे यांना खोकला येत होता, तसेच कफ साचल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.