तुषार पाचलकर / पाचल
राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील धनवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित रायपाटण या संस्थेची सातत्याने आर्थिक क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने घोडदौड सुरू असून त्याचीच दखल घेऊन या वर्षीचा बँको पतसंस्था सहकार परिषदे मार्फत पाच कोटींच्या ठेवी विभागामध्ये सन २०२४ चा बँको ब्ल्यूरिबन राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये द्वितीय क्रमांक धनवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंसंस्था मर्यादित- रायपाटण यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, यांच्या हस्ते तसेच बँकोचे अविनाश शिंत्रे,गॅलेक्सी इन्माचे संचालक अशोक नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष नजीर गुडेकर, उपाध्यक्ष अनिल पाटणकर संचालक विनायक निखार्गे व सचिव किशोर गुरव यांना देण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याने पतसंस्थेच्या संचालक मंडळ, सभासद,ठेवीदार,खातेदार यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून रायपाटण गावच्या ग्रामस्थांनी पतसंस्थेचे अभिनंदन करताना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.