चिपळूण : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पिंपळी बुद्रुक या शाळेत प्रजासत्ताक दिनी साकारलेला भारतीय नकाशा सर्वांचे आकर्षणाचा विषय ठरला.
शाळेतील पदवीधर शिक्षक सुनिल जाबरे व सहकारी, मुख्याध्यापक सुविधा गांधी, ज्येष्ठ शिक्षिका सौ. अलका जोशी व सौ. नेहा गंगावणे यांच्या सहकार्याने प्रजासत्ताक दिनाची एक तयारीचा भाग म्हणून भारताचा भव्य स्वरूपातील नकाशा २० बाय १६ फुटाचा काढण्यात आला. या नकाशामध्ये मेथी, गहू, मोहरी, हलीम आदी धान्याचा वापर करून एक आकर्षक नकाशाची प्रतिकृती तयार करण्यात आली. हा नकाशा सर्वांचा आकर्षणाचा एक भाग ठरला. यासाठी सौ. लक्ष्मी शिगवण, सौ. रेश्मा शिगवण, भाऊ आग्रे, विद्यार्थी, पालक यांचे विशेष सहकार्य लाभले. तर शिक्षण विस्तार अधिकारी श्री. देसाई व केंद्रप्रमुख सौ. जाधव यांनीही या प्रतिकृतीबद्दल शाळेचे कौतुक केले.