चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण नगर परिषदे मार्फत शहरामध्ये ‘महाराष्ट्र शासन- माझी वसुंधरा अभियान ५.०’ राबविण्यात येत आहे. त्या अनुषगाने माझी वसुंधरा अभियान ५.० च्या प्रभावी अमंलबजावणी करिता कृती बिंदू वायू मधील इंडीकेटर नुसार नागरिकांमध्ये सायकल वापरास प्रोत्साहन देण्यासाठी नूतन वर्षाच्या प्रारंभाकरिता दर महिन्याच्या ०१ तारखेला खाजगी वाहनाने न येता सायकल किंवा पायी येऊन सायकल दिवस हा उपक्रम राबविण्यात येतो. दिनांक १ फेब्रुवारीपासून सदर उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
तसेच आता दर महिन्याच्या ०१ तारखेला सदरचा उपक्रम साजरा केला जातो. सुरुवातीस स्ट्रावा एप्लिकेशन वरुन आपले चिपळूण न्गर परिषद क्लब जॉईन करुन या उपक्रमात सहभागी होण्यास आव्हान करण्यात आले. त्यानंतर आरोग्य निरिक्षक सुजित जाधव यांनी माझी वसुंधरा अभियान अतंर्गत या उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर आजच्या उपक्रमाबाबत मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी शासनाच्या माझी वसुंधरा या उपक्रमाबाबत आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर चिपळूण शहरामधील गेली अनेक वर्षे कोणत्याही वाहनाचा उपयोग न करता आपले दैनंदिन कामकाज सायकल वापरुन करित असलेल्या तीन नागरिकांचे प्रातिनिधिक स्वरुपात सन्मान करण्यात आला. त्यामध्ये अजित जोशी यांचा सन्मान विशाल भोसले, प्रशांत दाभोळकर यांचा सन्मान प्रभाकर सुर्वे, श्रीकांत जोशी यांचा सन्मान मंगेश पेढांबकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर नेहमीच आपला दैनंदिन कामकाज जास्तीत जास्त पायी चालून करित असलेले सुरज गोपाळ भोई यांचा सन्मान माजी नगरसेवक राम रेडीज, शेखर मोहिते यांचा सन्मान प्रकाश ऊर्फ बापू काणे, चंद्रशेखर खेडेकर यांचा सन्मान विशाल भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर सर्व उपस्थितमधील सायकल धारकांनी चिपळूण नगर परिषद कार्यालय ते नाथपै चौक-रंगोबा साबळे रोड बहादूरशेख नाका ते चिपळूण नगर परिषद कार्यालय येथे सांगता करण्यात आली. तसेच सदर मार्गे इतर सर्व नागरिकांनी व कर्मचाऱ्यांनी पायी चालून सदरच्या उपक्रमात सहभाग घेऊन आपली उपस्थिती नोंदवली. सदर कार्यक्रमाला चिपळूण शहरातील सुमारे १५० नागरिक व कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमास प्रकाश काणे, प्रभाकर सुर्वे, दिलीप आंब्रे, राम रेडीज, संतोष दंडवते, समिर कोवळे, अजित जोशी आदी उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, उद्यान विभाग प्रमुख प्रसाद साडविलकर तसेच नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी संपन्न केला.