रत्नागिरी:- 29 व 30 जानेवारी रोजी र. ए .सोसायटी अंतर्गत जवाहर मैदानावर कै.मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यामंदिर ल.ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर आणि जी. जी.पी. एस. प्राथमिक विभाग यामध्ये दरवर्षीप्रमाणे अंतर शालेय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ अपूर्वा मुरकर . कै. मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक श्री अनिल गार्डी. ल .ग. पटवर्धन प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. सायली राजवाडे .जी.जी.पी.एस. प्राथमिक विभागाचे शाळा समिती अध्यक्ष श्री सुहास भाऊ पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडला.
सूर्यनमस्कार, धावणे,लंगडी, मार चेंडू यासारख्या विविध स्पर्धांचा समावेश यामध्ये होता.त्यामध्ये कै. मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यामंदिर ला तृतीय क्रमांक .ल.ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरला द्वितीय क्रमांक मिळाला. तर जी.जी.पी.एस प्राथमिक विभागाने प्रथम क्रमांक मिळवून आंतरशालेय क्रीडा स्पर्धेमध्ये आपले वर्चस्व दाखवून दिले.
स्पर्धा अतिशय आनंदात उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. विजेच्या तसेच उपविजेत्या आणि सहभागी संघाला सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेच्या वेळी तीनही शाळांचे क्रीडा शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व विजयी व सहभागी खेळाडूंचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले.