देवरुख:-संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे येथे जेसीबी चोरीप्रकरणी लांजा येथील तरूणावर देवरूख पोलीस ठाण्यात 1 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, या बाबतची फिर्याद जे. सी. बी. चालक अनिल सोमू राठोड (रा. इंगळेश्वर, ता. बसतबागेवाडी, जि. विजापूर) याने दिली. राठोड हा सध्या कामानिमित्त पाली जानमाळ येथे राहतो. राठोड याने जेसीबी (क्र.एमएच-08, जी-9370) सत्यवान खेडेकर यांच्या घरासमोर लावून ठेवला होता. प्रकाश कृष्ण राणे (रा. लांजा) याने कोणत्याही प्रकारची लेखी सूचना न देता सहमतीशिवाय हा जेसीबी चोरून नेल्याचे अनिल राठोड याने फिर्यादीत नमूद केले आहे. 10 लाखाचा जेसीबी चोरीस गेल्याचे स्पष्ट केले आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार प्रकाश राणे याच्यावर देवरूख पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास देवरूख पोलीस करीत आहेत.