देवरुख:-संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी भेंडा माळ येथे 5 महिन्याच्या बालिकेचा तापाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 31 जानेवारी रोजी घडली. मयुरेश जणू जांगळी असे मृत बालकाचे नाव आहे.
देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मयुरेशला ताप आल्याने उपचारासाठी तत्काळ कुटुंबियांनी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र मयुरेशची प्रकृती अधिक बिघडल्याने वैद्यकीय सूत्रांनी त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यास सांगितले. रत्नागिरी येथेही मयुरेशची प्रकृती खालावत चालल्याने डॉक्टरांनी त्याला कोल्हापूर येथील सीपीआर रूग्णालयात नेण्यास सांगितले. कोल्हापूर येथे रूग्णवाहिकेतून जात असताना वाटेतच त्याची तब्येत बिघडल्याने रूग्णवहिका पुन्हा जिल्हा रूग्णालयात आणण्यात आली. यावेळी वैद्यकीय सूत्रांनी तपासणी करून मयुरेशला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे जांगळी कुटुंबियांसह मुर्शी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या बाबत देवरूख पोलीस ठाण्यात शनिवारी आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.