खेड :तालुक्यातील खेड-कुडोशी मार्गावर खचलेल्या रस्त्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरून धावणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच मार्गस्थ व्हावे लागत आहे. ही बाब अजूनही प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या मार्गावर वाहनचालकांसह पादचाऱ्याची सतत वर्दळ सुरू असते. रस्त्यालगतचा भाग खचल्याचे काही जागरूक ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच खबरदारी म्हणून त्या ठिकाणी दगड लावून धोक्याची सूचना देण्यात आली आहे. येथे असलेली मोरीही फुटल्याने वाहनचालकांचा जीव टांगणीवरच आहे. या मार्गावरून वाहने असताना सावधानता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.