महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या राज्यकार्यकारिणीच्या बैठकीत अभिजित हेगशेट्ये यांचे प्रतिपादन
अंधश्रद्धा बुवाबाजी, जादूटोणा विरोधात जनजागृती महवाची
रत्नागिरी:-आर्टिफीशिअल इंटलेजीअन्सचे युग आहे, विज्ञानिष्ठ दृष्टिकोन ही काळाची गरज आहे. अंधश्रद्धा बुवाबाजी, जादूटोणा यांत अनेक आयूष्य आणि पिढ्या बरबाद होत आहेत. यांत सर्वसामान्य माणसाचे प्रचंड शोषण होत आहे. या विरोधातील लढाई आणि जनजागृतीचे अभियान राबविणे हे काम महत्वाचे. या निमित्ताने स्वत:चे आणि आपल्या कामाचे आत्मपरीक्षण गरजेचे असल्याचे समाजवादी कार्यकर्ते आणि नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांनी सांगितले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या राज्यकार्यकारिणीची दोन दिवसीय नियोजन सभा रत्नागिरी गांजूर्डे येथे होती. या सभेचे उदघाटक म्हणून हेगशेट्ये उद्घाटक म्हणून ते बोलत होते. मला हा सन्मान दिल्या बद्दल मअनिस चे मी विशेष आभार व्यक्त करतो असेही ते म्हणाले. अंधश्रद्धा निर्मुलन कार्याशी माझा १९८१-८२ पासूनच नाळ जोडली गेली आहे. या आठवणींचा धांडोळा या निमित्ताने घेतला. महाविद्यालयीन काळात बी प्रेमानंद यांची देशभरातील विज्ञान यात्रा, त्याचे रत्नागिरी जिल्ह्यातील नियोजनात सहभाग, मंत्राने अग्नी पेटविणे, त्वचेतून दोरा पार करत त्याला लिंबू लटकत ठेवणे, जीभेतून त्रीशूळ पार करणे असे विविध चमत्कार आणि रात्रीच्या अंधारात धगधगत्या निखार्यावरुन अनवाणी पायांने चालण्याचा थरारक प्रयोग त्या पाठोपाठ सर्वांना अग्नीवरुन चालण्याचा आग्रह आणि यांत हजारो मुले माणसे यांचा उत्सफुर्त सहभाग त्यातील विज्ञान ते समजावून सांगतांना ह्यात कोणताही चमत्कार नाही हे सांगत . बी प्रेमानंद यांची विज्ञान यात्रा हजारो तरुणांना विज्ञाननिष्ठ वैचारिकतेचे बाळकडू देत होती . आजही तो प्रभाव घट्ट मुळे धरुन आहे.
सामाजिक कृतज्ञता निधीसाठी लग्नाची बेडी नाटकाचे प्रयोग संपुर्ण महाराष्ट्रात झाले. निळू फुले, श्रीराम लागू, भारती आचरेकर, रिमा लागू, सदाशिव अमरापूरकर अशी दिग्गज सिने अभिनेते आणि संयोजन आयोजन डॅा. नरेंद्र दाभोळकर यांचे, कोकणातील रत्नागिरीची जबाबदारी माझ्याकडे होती, जेके फाईल्सचे प्रमुख सर्वोत्तम ठाकूर सोबत होते. यावेळी डॅा. नरेंद्र दाभोळकर यांचा सहवास लाभला आणि अंनिस चळवळीचा एक भाग झालो. डॅा. दाभोळकर यांना माझ्या यामाहा मोटरसायकलवरून रत्नागिरी जिल्हा भ्रमंतीचे भाग्य मला लाभले. त्या नंतर नरेंद्र महाराज यांच्या नरेंद्र गाथा या चमत्कार सांगणाऱ्या मृताला जीवंत करण्याच्या कथा सांगणाऱ्या चमत्कारांना दाभोळकर यांनी दिलेले आव्हान. थेट महाराजांच्या गडांवर झालेली प्रश्न उत्तरे, पुस्तकातील दावे माझे नाहीत ते भक्तांनी केले असतील. त्यामुळे मी ते सिध्द कसे करणार, मी विज्ञाननिष्ठच आहे. हा त्यांचा युक्तीवाद. अशा अनेक आठवणींना उजाळा मिळाला.
या कार्यक्रमावेळी डॅा. हमीद दाभोळकर, क्रेडाई अध्यक्ष नित्यानंद भूते, मुक्ता दाभोळकर, विनोद वायंगणकर, भैया वणजू, गणेश चिंचोले, राहूल थोरात , दिपक गिरमे, राधा वणजू, जयश्री बर्वे, वल्लभ वणजू, अनिश पटवर्धन, मधुसूदन तावडे हे मान्यवर उपस्थित होते.