दापोली : विवाहितेचा छळ, ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुदस्सर शाबुद्दीन चिपळुणकर (पती, २१, शहाबुद्दीन जाफर चिपळुणकर ( वय ७०), फिरोजा शाबुद्दीन चिपळुणकर (५८), सबा शाबुद्दीन चिपळुणकर (१९, सर्व रा. नशेमन कॉलनी दापोली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार , याबाबत सविस्तर वृत्त आहे की,मागील 1 वर्षापासुन लहान सहान कारणावरुन चिपळूणकर कुटुंब पीडित महिलेला त्रास देत आहेत.
दरम्यान पीडित महिला माहेरी चिपळुण येथे गेल्या होत्या. त्या कारणावरून सासरच्या लोकांनी राग धरून एकमेकांचे संगनमताने तिला शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात केली. हाताच्या थापटाने मारहाण करण्यात आली असून ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्यांना घरातील बेडरूम मध्ये कोंडून ठेवण्यात आले होते. त्यामुळे बाहेर पडणे कठीण होते. त्यावेळी पतीने रात्री १२.३० वा. च्या सुमारास पैसे मागुन पीडितेला मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याने म्हंटले माझ्या प्रापॅटि पेपर सही कर व तु निघुन जा असे बोलु लागला असे पीडितेला सांगितले. सही करण्यास नकार दिला तेव्हा त्याने मला बेडरुमध्ये बंद करुन तो निघुन गेला. सकाळी ०९.३० वा. चे सुमारास त्यांच्या पतीने येऊन बेडरुमचा दरवाजा उघडला व परत मारहाण करू लागला तसेच सासु बेडरुम मध्ये आली तिने ही प्रॉप्रटि पेपरवर सही कर असे म्हणुन पीडितेच्या कानाखाली मारली तसेच पाण्याच्या रिकाम्या बॉटली फेकुन मारली. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात 4 जणांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.