रत्नागिरी: अंत्योदय प्रतिष्ठान व मी मुंबई अभिमान अभियान प्रतिष्ठान यांच्यामार्फत प्राप्त 4 डायलिसीस मशीनचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते फित कापून आज लोकार्पण करण्यात आले.
यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार नारायण राणे, आमदार प्रसाद लाड, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये आदी उपस्थित होते.