मंडणगड : तालुक्यातील पालवणी-धनगरवाडी येथे शुक्रवारी (ता. ३१ जानेवारी) विठ्ठल गुणाजी हिरवे यांच्या गोठ्यात बिबट्या शिरून ६ जनावरांवर हल्ला केला. यामध्ये २ वासरांचा मृत्यू झाला आहे, तर दोन वासरे गंभीर जखमी झाली आहेत. दोन मोठ्या गायींना जखमी केले आहे.
वाडीपासून काही अंतरावर हा गोठा आहे. या गोठ्यात गुरे बांधलेली होती. एका कोपऱ्यामधून बिबट्या आत शिरला आणि त्याने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये दोन वासरे गंभीर जखमी झाली, दोघांचा मृत्यू झाला. दोन गायींवर बिबट्याने हल्ला करून त्यांना
जखमी केले. पालवणी धनगरवाडी परिसरात मागील अनेक दिवस बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे या विभागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याचा लवकरच वनविभागाने बंदोबस्त करून पालवणी पंचक्रोशीतील नागरिकांना भयमुक्त करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेची माहिती वनविभागाचे वनपाल अनिल दळवी यांना मिळताच वनविभागाने तत्परतेने दखल घेऊन घटनास्थळाचा पंचनामे करून योग्य ती भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन विठ्ठल गुणाजी हिरवे यांना दिले.
मंडणगडमध्ये बिबट्याचा गोठ्यात शिरून 6 जनावरांवर हल्ला; 2 वासरांचा मृत्यू
