वाडी वस्तीवर आग नियंत्रणात आणण्यासाठी ठरणार उपयोगी
लांजा : लहान वाडीवस्तीत लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लांजा नगरपंचायतीकडे फायर बुलेट दाखल झाली आहे. लांजा नगरपंचायत हद्दीत लहान वाडीवस्तीमध्ये आग लागण्याची घटना घडल्यास या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर बुलेट उपयोगी ठरणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आधुनिक दुचाकी देण्यात आली आहे.
लांजा नगरपंचायत हद्दीतील वाडीवस्ती आणि अरुंद रस्ते अशा ठिकाणी आग लागल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांची व प्रशासनाची धावपळ होत असते. आता अत्याधुनिक फायर बुलेट मिळाल्याने वाडीवस्ती मधील आगीवर नियंत्रण मिळवता येणार आहे.
दरम्यान, या फायर बुलेटच्या लोकार्पण सोहळ्याला प्रसंगी मुख्याधिकारी हर्षला राणे, नगराध्यक्ष मनोहर बाईत, नगरसेवक संजय यादव, सचिन डोंगरकर, प्रसाद डोर्ले, मंगेश लांजेकर, रफिक नेवरेकर तसेच नगरसेविका मधुरा लांजेकर, पुर्वा मुळे, यामिनी जोईल, दूर्वा भाईशेट्ये, मधुरा बापेरकर, वंदना काटगाळकर, सोनाली गुरव, समृद्धी गुरव आदींसह नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.