मंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांचे प्रयत्न
राजापूर : रत्नागिरीचे पालकमंत्री उदय
सामंत व राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या विशेष पाठपुराव्याने राजापूर शहरातील विविध रस्ते, संरक्षक भिंती, गटारे व अन्य अशा सुमारे ३७महत्त्वपूर्ण कामांना जिल्हा नियोजन समितीमधून ४ कोटी ८० लाख रुपयांचा निधी समितीकडून उपलब्ध झाला आहे, अशी माहिती शिंदेसेनेचे शहरप्रमुख सौरभ खडपे यांनी दिली.
या सर्व कामांच्या निविदाप्रक्रिया पूर्ण होऊन काम करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले असून, लंवकरच या कामांचा शुभारंभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील विविध प्रभागांतील रस्ते व अन्य कामे प्रलंबित होती. शहरातील भटाळीकडे जाणारा रस्ता, जवाहर चौक ते रानतळे रस्ता खराब झाला आहे. कोंढेतड भागातील रस्ता रुंदीकरण, धोपेश्वर निशाण घाटी रस्ता यासह शहराच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून सर्व भागात आवश्यक असलेली विकासकामे यामध्ये समाविष्ट करून आमदार किरण सामंत यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध केला आहे. नगर परिषद प्रशासनाकडून आवश्यक त्या निधी सर्व पूर्तता करून प्रस्ताव पाठवण्यात आले होते. विविध ३७ कामांना ४ कोटी ८० लाखांचा निधी उपलब्ध झाला असून, ही कामे लवकरात लवकर मार्गी लागणार असल्याचे खडपे यांनी सांगितले. या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यांत आले असून, ३१ मार्चपर्यंत ही सर्व कामे पूर्ण केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.