रत्नागिरी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या अर्जाची छाननी सुरू झाली आहे. यामध्ये स्वतःहून महिलांनी आपण लाभातून माघार घेत असल्याचे कळवायचे आहे. अन्यथा छाननीत हे अर्ज बाद होणार आहेत. जिल्ह्यात ४ लाख १७ हजार लाभार्थी महिला आहेत. त्यांपैकी फक्त ४ महिलांनी
या योजनेतून माघार घेत असल्याचे कळवले आहे. निकषात बसण्यासाठी उर्वरित सर्व अर्जाची छाननी करूनच पुढील लाभ दिला जाणार आहे.
योजनेवर होणाऱ्या खर्चावर नियंत्रण आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने शासनाने निकषामध्ये बसण्यासाठी अर्जाची छाननी सुरू केली आहे.