राजापूर : वाटूळ येथे दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन १ फेब्रुवारी आणि २ फेबुवारीला होत आहे. यानिमित्ताने संमेलनाच्या पूर्वसंध्येला रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
रांगोळी स्पर्धेला वाटूळ गावातील विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिलाय वाटूळमध्ये होणाऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे प्रतिबिंब या स्पर्धेत रेखाटण्यात आले आहे स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर आणि लांज्यातील रंगकर्मी किरण बेर्डे करणार आहेत.
चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळाले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना संमेलनाध्यक्ष दिनकर गांगल, भारताचार्य सु. ग. शेवडे, उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.