नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण लोकसभेत शनिवारी अर्थसंकल्प सादर करतील. निर्मला सितारामण आठव्यांदा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. यंदाच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.पंतप्रधान मोदींनीही आपल्या भाषणातून सूचित केले.
२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाला मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान, राजकोषीय निर्बंध न सोडता विकासाला चालना देण्याचे सर्वात मोठे आव्हान अर्थमंत्र्यांसमोर म्हणजे आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामण यावेळी सलग आठवा अर्थसंकल्प सादर करून विक्रम करण्याच्या तयारीत आहेत. निर्मला सितारामण या भारताच्या पहिल्या महिला पूर्णवेळ अर्थमंत्री आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१९ मध्ये सरकार स्थापन झाल्यापासून त्यांनी सलग सात अर्थसंकल्प सादर केले आहेत आणि यावर्षी त्या आठव्या अर्थसंकल्पासह एक नवा विक्रम प्रस्थापित करणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या विधानामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन देशवासीयांमध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण करेल आणि त्यांना नवी ऊर्जा देईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले. सोबतच त्यांनी आगामी सर्वसाधारण अर्थसंकल्प पाहता देशातील सर्व गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांवर देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद राहावा, अशीही प्रार्थना केली.
अर्थसंकल्पात काय असू शकते?
२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात आर्थिक गोष्टींना चालना देण्यासाठी भांडवली खर्चात २० टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. यामुळे लोकांना खर्च करण्यासाठी अधिक पैसे मिळतील. याशिवाय, पुढील आर्थिक वर्षासाठी राजकोषीय तूट देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ४.४ टक्के ठेवण्याचे लक्ष्य ठेवले जाऊ शकते.