खेड / प्रतिनिधी:-तालुक्यातील भोस्ते येथील एका घरातून 1 लाख 92 हजार रुपये किमतीचे दागिने व रोकड असा 2 लाखां ऐवज लंपास करणाऱ्या वेदांत शिवप्रसाद भंडारे (रा. भोस्ते-विरीवाडी) या चोरट्यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता जामिनावर सुटका करण्यात आली.
पूजा संतोष भंडारे यांनी पोलीस स्थानकात घरफोडी झाल्याची तक्रार नोंदवताच पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी तपासाला गती देत अवघ्या काही तासातच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्याच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह रोकडही हस्तगत केली होती.