खेड / प्रतिनिधी:- तालुक्यातील कुडोशी-जांभूळवाडी येथे गुरुवारी दुपारी 3.15 च्या सुमारास वणवा लागल्याने ग्रामस्थांची त्रेधातिरपीट उडाली. वणव्याने रौद्ररूप धारण करत नजीकच्या घरापर्यंत वणवा पसरत असल्याची बाब निदर्शनास येताच ग्रामस्थांनी येथील नगर परिषदेच्या अग्निशमन केंद्रास कळवले. त्यानुसार अग्निशमन केंद्रातील फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ, वाहनालक गजानन जाधव तातडीने घटनास्थळी पोहोचून वणवा नियंत्रणात आणला. यामुळे गुरांच्या गोठयाना पोहाचणारा धोका टळताच शेतकऱ्यानी सुटकेचा निश्वास टाकला.