रत्नागिरी:-भारतातील पहिले दिव्यांग विभागाचे अध्यक्ष असलेले माजी मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू प्रथमच जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने जिल्ह्यातील दिव्यांगांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. येत्या 3 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्व दिव्यांगाच्या समस्यांबाबत जनता दरबाराचे आयोजन केल्याचे जिल्हा समन्वय समिती जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील दिव्यांगांचे तारणहार म्हणून माजी मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्याकडे पाहिले जाते. त्यांया प्रमुख उपस्थितीत 3 फेब्रुवारीरोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात दिव्यांग जनता दरबाराचे आयोजन केले आहे. यादिवशी दुपारी 12 ते 4 या वेळेत बच्चू कडू दिव्यांगांचे प्रश्न व त्याचे निराकरण करणार आहेत. प्रहार क्रांती संस्था व दिव्यांग समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.
दिव्यांग समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी, प्रहार क्रांती संस्थेचे जिल्हाध्यक्ष शैलेश पोस्टुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. भारतातील पहिले दिव्यांग विभागाचे अध्यक्ष असलेले बच्चू कडू प्रथमच जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने जिल्ह्यातील दिव्यांगांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील समस्या असलेल्या सर्व दिव्यांगांनी या दिव्यांग जनता दरबारासाठी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा समन्वय समिती जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी, उपाध्यक्ष अशोक भुस्कुटे, सचिव अमित आदवडे, कार्याध्यक्ष सादिक नाकाडे, उपाध्यक्ष विजय कदम, प्रहार क्रांती संस्थेचे जिल्हाध्यक्ष शैलेश पोस्टुरे, सचिव सुरेश जोशी यांनी केले आहे.