खेड / प्रतिनिधी:-कोकण रेल्वे मार्गावरील कोतवली रेल्वे रूळावर 60 ते 65 वयोगटातील वृद्धाचा मृतदेह आढळला. या मृत वृद्धाची अद्याप ओळख पटलेली नाही. रेल्वे कर्मचारी गस्त घालत असताना मृतदेह निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.