लांजा : मुंबई गोवा महामार्गावर कुवे येथे कंटेनरने दुचाकीस्वाराला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. शिवाजी रामा भेरे (५४, रा.कुणगे, आरगाव, ता.लांजा, जि.रत्नागिरी) असे ठार झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, शिवाजी मोरे हे आपल्या दुचाकीवरून मुंबई गोवा महामार्गाने चालले होते. यावेळी गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. कंटेनर वाटूळ येथे आला असता चालकाने मोरे यांच्या गाडीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये मोरे यांच्या डोक्याला मार लागला. या धडकेत मोरे जागीच ठार झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अपघातानंतर कंटेनर चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना ग्रामस्थांनी त्याला पकडले. या अपघाताची माहीती लांजा पोलिसांना दिल्यानंतर कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी करण्यात येत आहे.