रत्नागिरी:-महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कॉलेज ऑफ नर्सिंग,रत्नागिरीचा प्रथम वर्ष ए. एन. एम. (ANM) चा निकाल राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला.
महाविद्यालयच्या प्रथम वर्षाचा १०० टक्के निकाल लागला आहे.
प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थिनी प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी मिळून प्रथम वर्ष एएनएम उत्तीर्ण झाल्या आहेत. महाविद्यालयातील कु. सिद्धी सुहास लिंगायत हिने प्रथम, कु. तेजस्विनी नारायण पालये हिने द्वितीय तर कु. मनीषा संतोष बोडेकर हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. ही या महाविद्यलायची पहिली तुकडी आहे.
सन २०२३-२४ ला महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने रत्नागिरीजवळ शिरगाव येथे नवीन कॉलेज ऑफ नर्सिंग सुरू केले. कॉलेज सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाची परवानगी उशिरा प्राप्त झाल्याने सुरवातीला उशिरा प्रवेश झाले होते. परंतु पहिल्याच वर्षी परीक्षेत उत्तम गुणांनी सर्व विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यामुळे कॉलेज ऑफ नर्सिंगचा निकाल १०० टक्के लागला आहे.
पहिल्याच वर्षात उत्तम यश संपादन केल्याबद्दल महर्षी कर्वे स्त्री शिक्षणतर्फे सर्व यशस्वी विद्यार्थिनी आणि त्यांच्यावर मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन संस्था पदाधिकारी, कॉलेज ऑफ नर्सिंग, स्थानीय व्यवस्थापन समितीचे चेअरमन डॉ. धनंजय कुलकर्णी, रत्नागिरी प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख मंदार सावंतदेसाई, सर्व स्थानीय व्यवस्थापन समिती सदस्य आदींनी कौतुक व अभिनंदन केले.