चिपळूण, (प्रतिनिधी) : इंग्लंड हून आलेल्या डॉक्टर्स, ऑपेरेशन थिएटर अससिस्टन्ट, नर्सेस अशा १८ जणांचा चमू डेरवण रुग्णालयात दाखल झाला आहे.
ब्रिटिश चमू गेली १८ वर्ष सातत्याने रुग्णालयास भेट देत आहे. हे त्याचे १९ वे वर्ष आहे. ही टीम ता. २५ रोजी याठिकाणी दाखल झाली आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत ब्रिटिश डॉक्टर यांची विद्यार्थ्यांसाठी अनेक विषयांवर व्याखाने सादर झाली. या व्याख्यान माले मध्ये येथील १५० डॉक्टर्स, मेडिकल स्टुडन्ट्स, सिस्टर्स, नर्सिंग स्टुडन्ट्स, फिजोथेरपी स्टुडन्ट्स सहभागी झाले होते. या व्याख्यानमालेत डॉ. सारंग पुराणीक (लंडन येथील भूलतज्ज्ञ) यांनी ऑपेरेशनच्या आधी रुग्णांची कोणती काळजी घ्यावी या विषयी व्याख्यान दिले. डॉ. अमित चान्द्रये (लंडन स्थित अस्थिरोग तज्ज्ञ) यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रॅक्चर्स विषयी व त्यावरील उपचारावरती व्याख्यान दिले. डॉ. ॲना मेरी विल्किन्सन (स्कॉटलंड) यांनी रुग्णांना वापरण्यात येणाऱ्या अँटिबायोटिक्स विषयी माहिती दिले.
डॉ. न्टोसोस (ग्रीस) ह्यांनी नेत्र या विषयावर सादरीकरण करत मोतीबिंदू, काचबिंदू इत्यादी आजारांवरील शस्त्रक्रियेसंदर्भात व्याख्यान दिले. डॉ. पलभा जैन अनेस्थेशिस्ट यांनी स्टिरॉईड औषध वापरण्याच्या साईड इफेक्ट्स या संदर्भात याख्यान दिले. हे ब्रिटिश वैद्यकीय पथक डेरवण रुग्णालयातील डॉक्टर्स, मेडीकल महाविद्यालयातील मेडिकल स्टुडन्ट्स, सिस्टर्स, नर्सिंग स्टुडन्ट्स, फिजोथेरपी स्टुडन्ट्स यांना बदललेल्या आधुनिक उपचार पध्दती संदर्भात मार्गदर्शन करत आहे.