रत्नागिरी : ग्रामीण भागात काही वेळा
गर्भवतींना पुरेशा आरोग्याच्या सोयी-सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाने गर्भवती आणि बाळाच्या स्वास्थ्यासाठी आरसीएच (प्रजनन आणि बाल आरोग्य) पोर्टलची संकल्पना मांडली आहे. या पोर्टलवर माता व बाल स्वास्थ्याशी संबंधित महत्त्वपूर्ण सेवा पुरविल्या जातात. गोड बातमी समजताच गरोदर महिलेने तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधून आरसीएच पोर्टलवकर नोंदणी करावी.
आरसीएच पोर्टलमध्ये गर्भवती महिलांच्या तपासणीपासून ते नवजात बाळाच्या लसीकरणापर्यंत सर्व माहिती डिजिटल स्वरुपात नोंदविली जाते. नोंदणीनंतर महिलांना नंबर दिला जातो. यावर नोंदणी झाल्यावर शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो.
आई बाळाला असा होईल फायदा
सुरक्षित प्रसूतीसाठी मार्गदर्शन, बाळाच्या लसिकरणाची नोंद, आईचे पोषण व वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध होईल.
आरसीएच पोर्टल काय आहे?
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने माता व बाल आरोग्य संबधित सेवांची माहिती मिळवण्यासाठी प्रजनन व बाल आरोग्य पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
गर्भवती हेल्थ कुंडली
आर सी एच पोर्टल हे गरोदर महिलांसाठी हेल्थ आरोग्य कुंडली आहे. यामध्ये गर्भवतीचे वय वजन रक्तदाब हिमोग्लोबिन तपासणीचे अहवाल आणि प्रसूतीच्या तारखेची नोंद केली जाते. या माध्यमातून आरोग्य विभागाच्या योजनांचा लाभ मिळतो.