मेष : मेहनतीच्या जोरावर आज महत्त्वाचे काम पूर्ण कराल
मेष
मेष : श्रीगणेश म्हणतात की, मेहनतीच्या जोरावर आज महत्त्वाचे काम पूर्ण कराल. चांगली बातमी मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. धार्मिक कार्यातही तुमचा सहभाग असेल. मुलांच्या समस्या सोडवण्यात तुमचे योगदान असेल. व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे.
वृषभ : तरुणांना करिअरशी संबंधित यश मिळेल
वृषभ
वृषभ : श्रीगणेश सांगतात की, भूतकाळातील चुकांमधून शिकून तुम्ही तुमच्या कामाच्या पद्धतीत केलेले बदल सकारात्मक ठरतील. जवळच्या नातेवाईकाशी सुरू असलेला वाद सोडवता येईल. तरुणांना करिअरशी संबंधित यश मिळेल. घाईघाईत कोणतीही परिस्थिती प्रतिकूल ठरू शकते.
मिथुन : मालमत्ता खरेदीसाठी आजचा दिवस उत्तम
मिथुन
मिथुन : श्रीगणेश म्हणतात की, तुमची कामे योग्यरित्या करण्यापूर्वी त्यांची संपूर्ण रूपरेषा तयार करा. मालमत्ता खरेदीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. तरुणांना त्यांच्या कष्टात चांगले परिणाम मिळण्यात यश मिळेल. जवळच्या नातेवाईकांशी मतभेद टाळा.
कर्क : घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका
कर्क
कर्क : श्रीगणेश सांगतात की, कुटुंबाशी संबंधित वाद ज्येष्ठांच्या मदतीने सोडवता येईल. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. कोणत्याही कामात जोखीम घेण्याचा प्रयत्न करू नका. मुलांचे मनोबल उंचावण्यासाठी तुमच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. व्यावसायिक कामे सामान्य राहतील.
सिंह : पती-पत्नीमधील नात्यात काही वाद निर्माण होऊ शकतात
सिंह
सिंह : श्रीगणेश म्हणतात, आज आवडीच्या कामात वेळ व्यतित कराल. मुलांच्या गरजांना प्राधान्य द्याल. अनुभवी आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि सल्ला फायदेशीर ठरेल. शेजाऱ्यांशी वाद टाळा. मालमत्तेशी संबंधित कर्ज घेण्यापूर्वी चर्चेअंतीच निर्णय घ्या. आज व्यवसायाशी संबंधित कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. पती-पत्नीमधील नात्यात काही वाद निर्माण होऊ शकतात.
कन्या : आज नशिबाऐवजी कर्मावर विश्वास ठेवा
कन्या
कन्या : आज नशिबाऐवजी कर्मावर विश्वास ठेवा. एखाद्या सामाजिक सेवा संस्थेसोबत एका विशेष कामातही योगदान द्याल. तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा काळ चांगला नाही. कामाच्या क्षेत्रात आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका.
तूळ : हट्टीपणामुळे नात्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता
तूळ
तूळ : आज न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित कार्यवाही सुरू असेल तर निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. दिवस तुमच्या मनानुसार घालवल्याने ताण कमी होईल. घराशी संबंधित कामे जास्त खर्चाची होऊ शकतात. हट्टीपणामुळे नात्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता.
वृश्चिक : आज ज्येष्ठांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरेल
वृश्चिक
वृश्चिक : श्रीगणेश म्हणतात की, आज ज्येष्ठांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरेल. वैयक्तिक गोष्टी कोणालाही उघड करू नका. मुलाच्या कोणत्याही नकारात्मक कृतीमुळे मन अस्वस्थ होईल. आज कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका.
धनु : कठीण काळात विश्वासू मित्राचा सल्ला महत्त्वपूर्ण ठरेल
धनु
धनु : श्रीगणेश म्हणतात की, आज कठोर परिश्रमाच्या जोरावर कठीण काम पूर्ण कराल. दुपारी कोणतीही अप्रिय बातमी मिळाल्याने मन निराश होईल. कठीण काळात विश्वासू मित्राचा सल्ला महत्त्वपूर्ण ठरेल. व्यवसायातील यश तुमचा आत्मविश्वास वाढवेल.
मकर : व्यवसाय क्षेत्रात समर्पित वृतीने कार्यरत राहाल
मकर
मकर : श्रीगणेश सांगतात की, तुमचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. घरातील व्यवस्था योग्य ठेवण्यात तुम्हाला यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या तुम्ही थोडे गोंधळलेले असाल आणि समस्या उद्भवू शकतात. व्यवसाय क्षेत्रात समर्पित वृतीने कार्यरत राहाल.
कुंभ : कोणताही प्रवास टाळणे चांगले होईल
कुंभ
कुंभ : श्रीगणेश म्हणतात की, एखाद्याच्या मार्गदर्शनाचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक परिणाम होईल. सामाजिक कार्यात तुमचे योगदान असेल. कुटुंबातील सदस्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष करु नका. कोणताही प्रवास टाळणे चांगले होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
मीन : कोणाशीही चुकीचा वाद घालू नका
मीन
मीन : ग्रहमान अनुकूल आहे. कोणत्याही वैयक्तिक समस्येवर मात करण्यासाठी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. कोणाशीही चुकीचा वाद घालू नका. भागीदारीशी संबंधित कामे सुरू करण्यासाठी काळ अनुकूल आहे.