दापोली : राज्य परिवहन महामंडळाच्या वाढलेल्या भाडे दरवाढीविरोधात दापोली येथे ठाकरे शिवसेनेच्यावतीने माजी आमदार संजय कदम यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आगारप्रमुख राजेंद्र उबाळे यांना निवेदन देण्यात आले.
शिवाय ही दरवाढ रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणा दिल्या गेल्या. हे प्राथमिक आंदोलन असून दरवाढ रद्द न झाल्यास यापेक्षा मोठया प्रमाणात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी माजी आमदार संजय कदम, तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, जिल्हा सरािाटणीस अनिल जाधव, तालुका सािाव नरेंद्र करमरकर, नगराध्यक्षा ममता मोरे यांच्यासह शाखाप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.