रत्नागिरी:-ज्येष्ठ नागरिकांनी उतारवयात मधुमेह, ब्लडप्रेशर, कोलेस्ट्रॉल यासारख्या व्याधीतून मुक्त होण्यासाठी औषधांऐवजी नियमित किमान एक तास तरी योगाद्वारे निरोगी जीवनाचा मूलमंत्र आचरणात आणावा, असे आवाहन कुवारबाव परिसर जेष्ठ नागरिक संघाच्या साईनगर येथे झालेल्या मासिक स्नेहमेळाव्यात अनुभवसंपन्न ज्येष्ठ नागरिकांनी केले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष मारुती अंबरे होते. त्यांनी गाव तेथे ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करून ज्येष्ठांची संघशक्ती वाढविण्याचे आवाहन केले. त्यांच्या हस्ते जानेवारी महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचा शुभेच्छापत्र आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी योग प्रशिक्षक गणपत खामकर आणि स्मिता साळवी यांनी योगाचे महत्त्व विशद करून निरामय जीवनासाठी अनुभवकथन केले. नारायण नानिवडेकर यांनी पूज्य साने गुरुजी यांच्या खरा तो एकची धर्म… या प्रार्थनेचे महत्त्व विशद करताना समाजातील दलितांना प्रेमाने जवळ करून माणुसकी धर्म जपण्याचे आवाहन केले. प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर कासेकर यांनी फेस्कॉमच्या मनोहारी मनो युवा मासिकातर्फे जागतिक महिला दिनानिमित महिलांसाठी आयोजित निबंध स्पर्धेत महिला सदस्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन केले.
विनायक हातखंबकर यांनी सेवानिवृत्तांना रत्नागिरी जिल्हा पेन्शनर संघटनेत सहभागी होऊन आपल्यावर अन्याय दूर करण्यासाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले. दिलीपराव साळवी यांनी भक्तिगीतातून ज्येष्ठांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. संघटनेचे पदसिद्ध सदस्य श्यामसुंदर सावंतदेसाई यांनी फेसकॉमतर्फे ज्येष्ठांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.