चिपळूण:-एएस अँड सी ग्लोब ऑप कंपनीच्या माध्यमातून व सेवा सहयोग फाउंडेशन या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थेच्या सहकार्याने टेरव येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या शाळेतील पहिली ती सातवीच्या १५१ विद्यार्थ्यांना दप्तरे, वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून करण्यात आले. मुंबईतील रूपेश श्याम कदम फाउंडेशनच्या वतीने त्या शाळेतील तसेच सुमन विद्यालयातील मिळून २५८ विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास सुधाकर कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रश्मी काणेकर, उपाध्यक्षा दीक्षिता मोहिते, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मानवी मेंगे, मानसी दाभोळकर, रुचिता हेमंत, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र खांबे, टेरव वेतकोंड पोलीस पाटील वृषाली लाखण, मुख्याध्यापक दीपक मोने, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. टेरवसारख्या ग्रामीण भागात कंपनीच्या माध्यमातून सेवा सहयोग फाउंडेशनने अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल ऋण व्यक्त करण्यात आले.